रविवार, १४ जानेवारी, २०१८

जादूचा चौरस

जादूचा चौरस-  भालचंद्र अवधूत नाईक
हा लेख एलफिन्स्टोनियन्स-६५ च्या अंकांत यापूर्वी प्रकाशित झाला होता (२०१७)

माझे बालपण गिरगावात गेले. तिथे चर्नीरोड स्टेशनला लागून बालभवन ही मुलांच्या कलागुणांना वाव देणारी, त्यांना रिझवणारी एक संस्था आजही कार्यरत आहे. मुलांसाठी एक समृद्ध वाचनालय आहे आणि वैशिष्ठ्य म्हणजे कोणतेही पुस्तक निवडण्याचे, चाळण्याचे, तिथे बसून वाचण्याचे स्वातंत्र्यही आहे. कितीतरी पुस्तके तिथे मी लहानपणी वाचली.

गणितातील गंमती, आकड्यांची मौज आणि फौज यावरची पुस्तके माझ्या विशेष आवडीची. जादूच्या चौरसाची गोडी मला तिथेच लागली. हे चौरस कसे बनवतात याविषयी कुतूहल मला स्वस्थ बसू देत नसे. एकप्रकारे त्याचा ध्यासच जणू लागला. पुढे शोध घेता घेता त्यावरची इंग्लिश पुस्तकेही मोठेपणी चाळली गेली, वाचली गेली. पण मी जास्त आकर्षिला गेलो ते आपल्या संस्कृतच्या भाषांतरीत पुस्तकांनी. शिवाय हा आपला वारसा या अभिमानाने अधिकाधिक वाचले गेले. आपल्याला ते सांगावे आणि आनंद लुटावा, या भावनेने या अमोल खजिन्याची चावीच जणू मी आपल्याला देत आहे.

जादूच्या चौरसाची गंमत म्हणजे त्या चौरसातील प्रत्येक ओळीतील संख्यांची बेरीज तीच येते. कोणत्याही आडव्या ओळीतील, कोणत्याही उभ्या ओळीतील किंवा कर्णाच्या दिशेतील संख्यांची बेरीज सारखीच येते. खालील चौरस पहा:-

४२     ४९     ०२     ०७
०६     ०३     ४६     ४५
४८     ४३     ०८     ०१
०४     ०५     ४४     ४७

येथे जादूई बेरीज १०० आहे.

आडव्या बेरजा
४२+४९+०२+०७= १००
०६+०३+४६+४५= १००
४८+४३+०८+०१= १००
०४+०५+४४+४७= १००

उभ्या बेरजा
४२+०६+४८+०४= १००
४९+०३+४३+०५= १००
०२+४६+०८+४४= १००
०७+४५+०१+४७= १००

कर्णरेषेतील बेरजा
४२+०३+०८+४७= १००
०४+४३+४६+०७= १००

आणखीही काही प्रकारे बेरीज १०० येईल. तपासून पहा.

कसा बनतो हा जादूचा चौरस? कोणत्याही बेरजेचा करता येईल का? याचे उत्तर हो, करता येईल. एका संस्कृत श्लोकात ही माहिती आहे. श्लोक ऐकला होता पण नीट समजला नव्हता. पुढे कित्येक वर्षानंतर माझ्या मामेसास-यां बरोबर काव्य शास्त्र विनोदात ओघात आला, तो मी काळजी पूर्वक ऐकला. घरी आल्यावर आठवणीने लिहून काढला.गीर्वाणलघुकोशाच्या साह्याने अर्थ लावला आणि आत्मसात केला, तो हा श्लोक:-

वांच्छा कृतार्धा कृतमेकहीनम् |
द्वीये ग्रहे षोडश सप्तमेsष्टमे |
तिथ्यावतारे प्रथमेsवशिष्टे |
द्विसप्तषड्त्र्यष्ट भू वेद प्राणा: |

वांच्छा म्हणजे इच्छिलेली संख्या. वरील उदाहरणात आपली जादुई संख्या १००
कृतार्धा म्हणजे अर्धी केली १००/२= ५०
कृतम् एकम् हीनम् म्हणजे त्यातून क्रमाने एक वजा करून येणा-या संख्या ४९, ४८, ४७ ... वगैरे चौरसात भरायच्या. कुठे?

दुस-या व तिस-या चरणात याचे उत्तर दिले आहे.
द्वीये- दुस-या,
ग्रहे- नवव्या (ग्रह ९ आहेत)
षोडष- १६व्या, सप्तमे- ७व्या, अष्टमे- ८ व्या, तिथी- १५व्या (तिथी १५ आहेत)
अवतारे- १०व्या (अवतार- मत्स्य,कूर्म...इत्यादि १० आहेत), प्रथमे- १ल्या

खालील चौरसात ४९ दुस-या घरात, ४८ नवव्या घरात, ४७ सोळाव्या घरात, ४६ सातव्या घरात, ४५ आठव्या घरात, ४४ पंधराव्या घरात, ४३ दहाव्या घरात आणि ४२ पहिल्या घरात भरलेले पहा.

४२     ४९           
                   ४६     ४५
४८     ४३   
                   ४४     ४७

उरलेल्या ठिकाणी क्रमाने २,७,६,३,८,१,४ व ५ भरा. हे चवथ्या चरणात सांगितले आहे.
द्वि- २, सप्त- ७, षट्- ६, त्रि- ३, अष्ट- ८ (त्र्यष्ट= त्रि+अष्ट), कु= पृथ्वी-१, वेद- ४ (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे ४ वेद आहेत), बाण- ५ (मदनाचे ५ बाण)

हे उरलेल्या घरात भरले की आपला जादूचा चौरस तयार झाला

४२     ४९     ०२     ०७
०६     ०३     ४६     ४५
४८     ४३     ०८     ०१
०४     ०५     ४४     ४७

रविवार, २८ एप्रिल, २०१३

मॅथ्समॅजिशियन



"मॅथ्समॅजिशियन"
हा माझा लेख लोकरंग (लोकसत्ता) रविवार दि. २८ एप्रिल २०१३म्ध्ये प्रसिद्ध झाला आहे

भालचंद्र अवधूत नाईक
 
॥श्री:॥

            “बाळपणीच सर्वज्ञता वरी तयांते” या वर्णनाची आठवण व्हावी अशी गणिती प्रतिभा, आकड्यांशी लीलया खेळणाऱ्या  शकुंतलादेवींकडे होती. “मानवी संगणक” असे त्यांना म्हटले जाई एवढे त्यांचे आकडेमोडीवर प्रभुत्व होते. मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार, भागाकार आदि गणिती क्रिया त्या चटकन करत; पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे शालेय शिक्षणही झालेले नव्हते.
          बेंगळुरु येथील सेंट टेरेसा कान्व्हेंटमध्ये  पहिलीसाठी त्यांचे नांव नोंदविण्यांत आले होते; पण गरिबीमुळे मासिक २ रु फी सुद्धा भरता न आल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली होती. शालेय शिक्षण नसतानाही कुटुंबाच्या भरणपोषणाची जवाबदारी त्यांना उचलावी लागली. परमेश्वरी कृपेमुळे लाभलेल्या प्रतिभेमुळे गणिती कार्यक्रम मिळत गेले आणि जवळजवळ गेली ८० वर्षे त्यांनी गणिताचा आनंद घेतला आणि प्रेक्षकांनाही उपभोगू दिला. अशा या शकुंतलादेवींचे निधन बेंगळुरूच्या रुग्णालयांत अल्पशा आजारानंतर रविवार दि. २१ एप्रिल २०१३ ला झाले तेव्हां त्यांचे असंख्य चाहते हळहळले यांत नवल नाही.
            एका कानडी गरीब ब्राह्मण कुटुंबांत त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ या दिवशी झाला (काही बातमीपत्रांत १९३९ असे दिलेले आहे.) मंदिरातील पुजारी न बनता त्यांच्या वडिलांनी सर्कसमधील कलावंत म्हणून जगण्याचे ठरविलेले होते.उंच झुल्यांवरील कसरतींबरोबरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पत्त्यांचे जादूचे प्रयोगही ते करत असत. आपल्या मुलीची स्मरणशक्ती चांगली आहे हे त्यांनी ओळखले होते. हातचलाखीने ते जादू करत पण त्याची मुलगी शकुंतला केवळ स्मरणाने सर्व पत्ते बरोबर सांगत असे म्हणून वयाच्या ३ऱ्या वर्षीच त्यांनी तिला मदतीला घेणे सुरू केले. गणनक्रियेतील तिची सहजता आणि अचूकता प्रेक्षकांना अचंबित करत असे. थोड्याच अवधीत तिच्या गणिती कौशल्याची प्रसिद्धी सर्वत्र होऊ लागली आणि वयाच्य़ा केवळ ६ व्या वर्षीच म्हैसूर विश्वविद्यालयांत त्यांचा पहिला गणिती कार्यक्रम झाला.
            आपल्याला बुद्धिदात्या गणेशाच्या कृपेने ही “दैवी देणगी” प्राप्त झाली असे त्यांनी म्हटले आहे. सततच्या कार्यक्रमाने त्यात अधिकाधिक सफाई येत गेली आणि अनेक विक्रम नोंदविले गेले. १८ जून १९८०ला लंडन येथील इंपीरियल कॅ।लेजमध्ये त्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्या कॅ।लेजमधील संगणक विभागातील प्राध्यापकांनी दोन तेरा अंकी संख्यांचा गुणाकार करण्यास सांगितले. त्या संख्या अशा:
७,६८६,३६९,७७४,८७० X २,४६५,०९९,७४५,७७९
या गुणाकारचे अचूक उत्तर त्यांनी केवळ २८ सेकंदात दिले होते. १९९५च्या गिनीज बुक आफ वर्ल्ड रेकॅ।र्डस मध्ये त्याची नोंद झाली आहे.
            सर्वसामान्यांना सहज समजेल आणि गणिताची गोडी वाढेल असे कार्यक्रम त्या करत असत. कोणत्याही तारखेचा वार क्षणार्धांत सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता. कित्येक विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, गृहिणी त्यांना आपल्या जन्मतारखेचा वार सांगण्याची विनंती करत आणि त्या त्याचे
अचूक उत्तर ताबडतोब देत असत. हे कार्यक्रम बघायला मोठमोठ्या व्यक्ती येत असत. त्यांच्या घरच्या फोटॊ आल्बममध्यॆ अशा मोठ्या व्यक्तींबरोबर त्यांचे काढलेले अनेक फोटो आहेत त्यांत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सारखे शास्त्रज्ञ, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, हिलरी क्लिंटन, सचिन तेंडुलकर, कपिल देव असे अनेक आहेत.
            त्यांना काही जलद गणिताच्या रीती माहीत असाव्यात आणि त्याच्या जोरावर त्या सवयीने चटकन उत्तर देणे त्यांना जमत असावे अशी माझी समजूत होती. माझ्या एका विद्यार्थ्याने त्यांचा एक कार्यक्रम दूरदर्शनवर पाहून दहा अंकी संख्येचे पाचवे मूळ कसे काढतात असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याची रीत मी त्याला सांगितली पण तो जेव्हा म्हणाला की शकुंतला देवींनी २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ केवळ ५० सेकंदात सांगितले; तेव्हां मी अवाक झालो. ही दैवी देणगीच असली पाहिजे हे मला पटले. मी असे वाचले आहे की त्या काळच्या  UNIVAC 1108 या संगणकालाही ते उत्तर काढायला ६० सेकंद लागले तेव्हा संगणकावरही मात करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला मी मनोमन नमस्कार केला.
            त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे “फिगरिंग द जॅ।य आफ नंबर्स” हे माझे आवडते पुस्तक.त्यांत त्यांनी साध्या पाढ्यांपासून सुरुवात करून अनेक गणिती क्रियांमागची गूढे मनोरंजक पद्धतींनी उलगडली आहेत. “पझल्स टू पझल यू’, ’फन विथ नंबर्स”, ’इन द वंडरलण्ड आफ नंबर्स’ ही आणखी त्यांची काही चांगली पुस्तके. कोडी सोडविण्याच्या छंदातून गणिताची गोडी लागते आणि गणिती कौशल्यही विकसित होत जाते असे त्या म्हणत. सर्वांना विशॆषतः मुलांना गणिताची गोडी लागावी आणि गणिताचा आनंद उपभोगायला मिळावा यासाठी त्या प्रयत्न करीत. एक गणिती विश्वविद्यालय काढण्याचे त्यांचे स्वप्न होते.  ’अवेकन द जीनियस इन युवर चाइल्ड’  हे त्यांचे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे.
            गेली कांही वर्षे आपल्या शीघ्र गणिताधारे कुंडली मांडून लोकांना भविष्याविषयी मार्गदर्शन करत होत्या. अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे. ज्योतिष जाणून घेणाऱ्यांसाठी ’ Astrology for you’ हे पुस्तक लिहिले आहे.


भालचंद्र अवधूत नाईक
९८२०६८२३२८

२०१ अंकी संख्येचे २३वे मूळ
  
२ X २ X २ X २ X २…..अशा प्रकारे २ ही संख्या २३ वेळा घेऊन गुणाकार केला तर उत्तर ८३८८६०८ येते.
 ही ७ अंकी संख्या आहे. हे गणिती भाषेत  २चा २३वा घात ८३८८६०८ असे सांगितले जाते. 
किंवा ८३८८६०८ या ७ अंकी संख्येचे २३वे मूळ २ आहे असे म्हटले जाते.
            शकुंतलादेवींना एका कार्यक्रमांत पुढील संख्या दिली होती . यात एकूण २०१ अंक आहेत.
 या संख्येचे २३ वे मूळ त्यांना काढण्यास सांगितले होते. याचे उत्तर त्यांनी केवळ ५० सेकंदात दिले.
 त्याची गिनीज बुक आफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये नोंद झाली आहे

91674867692003915809866092758538016248310668014430862240712651642793465704086709659
32792057674808067900227830163549248523803357453169351119035965775473400756816883056
20821016129132845564805780158806771

             यात एकूण २०१ अंक आहेत. या संख्येचे २३ वे मूळ त्यांना काढण्यास सांगितले होते. याचे उत्तर त्यांनी केवळ ५० सेकंदात दिले. त्याची गिनीज बुक आफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये नोंद झाली आहे



           
           

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

KNOW VEDIC MATHHHEMATICS

Learn VEDIC MATHEMATICS
Contact Mr. Rohit Shinde on 9773058282 for details.

Mon.15/11/2010 to Fri.19/11/2010
6.30pm to 8.30pm
Students studying in VIIth Standard and above


Venue:Prabhu Seminary High School, 2nd floor,
Bhai Jeevanji Lane, Jagannath Shankarshet Road,
Near S.K. Patil Garden,Charni Road(E) Mumbai-400 002

मंगळवार, २० ऑक्टोबर, २००९

Vedic Mathematics Formulae.

Vedic Mathematics Formulae.

1) “By one more than previous (number)”

• To express decimal equivalent of vulgar fraction when denominator is
ending in 9
e.g. 6/19 = 0.315789473684210526…
• To find the square of numbers ending in 5.
e.g. (85)2 = 7225.

2) “(Subtract) All from 9, last from 10”

• To multiply 2 numbers when one of them is nearer to 10 or powers of 10.
e.g. 4368-5632
X 9999-0001
43675632
3) “Vertically and crosswise.”

• To multiply 2 numbers.
e.g. 123
X 321
39483
• To divide one number by another number: e.g.38982/73
___ 534|0___
73|383938|12 Ans: 534 and remainder 0

4) “Transpose and use”

• To divide one number by another which is nearer to 10 or powers of 10.
e.g. Divide 1234 by 112

1 1 2 | 1 2: 3 4
-1-2| -1:-2
| :-1-2
1 1: 0 2 Ans: 11 and remainder 02

5) “When there is similarity the entity is zero”

• (X+7)(X+9) = (X+3)(X+21)
Here 7x9 = 3x21 Therefore X = 0

6) “When one is in ratio the other is zero”

• To solve 2 simultaneous equations.
e.g. 6X + 7Y = 8
19X + 14Y = 16 Here 7:14 :: 8:16 Therefore X = 0 and Y = 8/7

B.A.Naik. 022-23869260 bhalchandra.naik@rediffmail.com Mo: 9820682328
7) “By addition and subtraction”

• To solve 2 simultaneous equations.
e.g. 45X – 23Y = 113
23X – 45Y = 91
By addition we get: 68X – 68Y = 204 i.e. X - Y = 3
By subtraction we get: 22X + 22Y = 22 i.e. X + Y = 1
Again by addition and subtraction we get: X = 2 & Y = - 1

8) “By completion and non-completion”

• To solve quadratic, cuboid type equations.
e.g. X3 - 6 X2 + 11X – 6 = 0
Complete the cube: X3 - 6 X2 + 12X – 8 – X + 2 = 0
(X – 2)3 = (X – 2) Therefore X – 2 = 0, -1 or 1 i.e. X = 2, 1 or 3.

9) “By differential calculus”

• To find roots of quadratic equation.
e.g. X2 – 7X + 12 = 0
Taking first differential equal to √ (b2 – 4ac) we get:
2X – 7 = +√ ((-7)2 – 4x1x12) i.e. X = 3 or 4.

10) “Whatever is less”

• To find the cube of numbers which are nearer to 10 or powers of 10.
e.g. (104)3 = 112 48 64. (Subtract -4 twice from 104 to get 112 Then multiply -4 and -12 to get 48 and then write the cube of 4 i.e. 64.

11) “Individual and whole”

• To solve algebraic equation.
e.g. (X+7)4+(X+5)4=706 Expressing it as sum of two forth powers we get:
(X+7)4+(X+5)4 =54+34 Therefore X+7=+5 and X+5=+3

12) “(Multiply) the remainders by last digit”

• 3, 2, 6, 4, 5, and 1 are the remainders when multiplied by 7 the last digits of the quotients will be: 1, 4, 2, 8, 5 and 7 respectively.
Therefore 1/7 = 0.142857

13“Last and twice the penultimate”

• To multiply by 12. e.g. 412 x 12 = 4944

• To solve the algebraic equations of the following form:
1/AB + 1/AC = 1/AD + 1/BC where A,B,C&D are in A.P. Then D+2C = 0.
e.g. 1/((X+2)(X+3)) + 1/((X+2)(X+4)) = 1/((X+2)(X+5)) + 1/((X+3)(X+4))
Here (X+5)+2(X+4) = 0 Therefore X = -13
B.A.Naik. 022-23869260 bhalchandra.naik@rediffmail.com Mo: 9820682328
14) “By one less than previous”

• To multiply by series of 9 say 99, 999 etc. when the number of digits in the multiplicand is less than or equal the number of digits in multiplier. e.g. 8x9=72. 11x99=1089. 231x999=230769

15) ”Sum of co-efficients”

• X3+6 X2 +11X+6 = (X+1)(X+2)(X+3)
1+6+11+6 = (1+1)(1+2)(1+3)
24 = 2x3x4

16) “First differential is equal to sum of the factors”

• Consider: X2 + 3X + 2 = (X+1)(X+2)
Here first differential is 2X + 3 = sum of factors: X+1 and X+2.
_____________________________________________________________________

मंगळवार, २७ जानेवारी, २००९

वैदिक गणिताचे जनक: भारती कृष्ण तीर्थजी महाराज

विसाव्या शतकांत वैदिक गणितातील सूत्रे जगद्गुरु शंकराचार्य श्री.भारती कृष्ण तीर्थजी महाराज यांनी शोधली.
त्यांचे मूळ नांव वेंकटरमण.जन्म:१९ मार्च १८८४,मद्रास येथे.वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या संस्कृतच्या ज्ञानामुळे सरस्वती ही पदवी त्यांना मिळाली.
१९०३ साली अमेरिकन कॉलेज ऑफ सायन्सच्या मास्टर ऑफ आर्टस या परीक्षेला मुंबई केंद्रातून ते ७ विषय घेवून बसले;आणि सर्व विषयात सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाले. इंग्लीश,संस्कृत,विज्ञान-रसायन,इतिहास,भूगोल,गणित आणि तत्वज्ञान हे ते सात विषय होत.